माथाडी कामगारही दाखल; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
कळंबोली : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची पडझड झाली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोलीमध्ये बुधवारी (दि. 8) हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार्यांचा ओघ सातत्याने सुरूच असून पक्षाने केलेली विकासकामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपचे विकासाचे कमळ हाती घेत आहेत. त्या अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष सुनील ढेंबरे यांनी त्यांच्या समर्थकांसह तसेच माथाडींच्या टोळी क्रमांक 42 ते 51 ब मधील कामगारांनी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील आणि माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या वेळी राष्ट्रीय युवा काँग्रेसचे खारघर कार्याध्यक्ष योगेश निपाणे, संकेत सावंत, इंकर मोरे, रजाक शेख, करण ढेंबरे, सचिन वर्णेकर, विनोद सुपो, विजय बेलोशो, सचिन ननावरे, सागर मोरे, अक्षय सस्तो, दिनकर झोरे, सुजित थोरात, प्रमोद पाटील, माधव थोरोके, रवींद्र फाटे, पंडित सुर्यवंशी, प्रितेश राणे, अमरजीत केवट, रोशन शेंडगे, अमन सिंग, शशांक वर्मा, सुरेश शर्मा, सत्नाकर जावीर, उदित नाईक, मनीष पब्नीकार, रोहित वर्मा, शाहरूख हसन, शेहबाज चौधरी, अरबाज चौधरी, अल्ताब चौधरी, राहुल शर्मा, विक्रम जैस्वाल, जगदीश विश्वकर्मा, पिंटू केवट, भरत पवार यांनी पक्षप्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांना पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड सरचिटणीस प्रिया मुकादम आणि माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या प्रेरणेतून खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिला दिन हा फक्त एक दिवस न साजरा करता वर्षाचे 365 दिवस साजरा करून महिलांचा सन्मान वाढवला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, माजी नगरसेविक प्रमिला पाटील, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव वर्षा भोसले, उत्तर रायगड सरचिटणीस प्रिया मुकादम, भाजप नेते बबन बारगजे, अशोक मुंडे, दिलीप बिस्ट, सित्तू शर्मा, प्रकाश मुंबईकर, प्रकाश शेलार, संदीप भगत, दत्तात्रय फरांदे, देविदास खेडकर, बायजाबाई बारगजे, संजीवनी मुंबईकर, विद्या फरंदे, शीतल कदम, विद्या गुरव, नीता अधिकारी, नंदा सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.