Breaking News

सत्तेच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादीकडून फक्त लुटमार भाजप नेते अशोक गायकर यांचा आरोप; कळंब जि. प. वॉर्डमधील महायुतीची बैठक

कडाव : प्रतिनिधी

सत्तेवर असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने देश व राज्याचे हित जपायचे सोडून फक्त लूट केली. त्यामुळे गेल्या पाच वर्षात देश हितासाठी दिवसरात्र झटणार्‍या नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला जोमाने काम केल पाहिजे. त्यामध्येच देशाचे व आपले हित आहे, असे प्रतिपादन भाजप  किसान मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गायकर यांनी यांनी रविवारी (दि. 31) कळंब येथे केले.  मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद वार्डमधील महायुतीतील शिवसेना, भाजप व आरपीआय कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशोक गायकर मार्गदर्शन करीत होते. महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे यांना जास्तीतजास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा निवडून देण्यासाठी आपण फक्त मन लावून काम करा कारण, आपले मत हे महायुतीच्या माध्यमातून थेट देशविकासाठी उपयोगी येणार आहे, असे शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदार संघाचे संघटक संतोष भोईर यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण व  जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकसंघपणे काम करतोय. कुणाच्याही आमंत्रणाची वाट न पाहता आपल्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी कर्तव्य समजून काम करा, असे मत भाजपचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत या बैठकीत व्यक्त केले. त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, तालुकाप्रमुख संभाजी जगताप यांनीही  संवाद साधला. सभापती राहुल विशे, तसेच राजेश जाधव, विष्णू झांजे, शिवराम बदे, विलास श्रीखंडे, सचिन म्हसकर, जीवन मोडक, भरत डोंगरे, प्रशांत झांजे, भरत हाबले, विनायक पवार, संतोष ऐनकर, रविंद्र ऐनकर आदी महायुतीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते   उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply