अलिबाग : प्रतिनिधी
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळासिद्धी उपक्रमातून सन 2020-21 या वर्षात स्वयंमूल्यमापन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 330 शाळांचा समावेश आहे. संबंधित शाळांना भेटी देऊन त्यांचे शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन करण्यात येणार असून ऑनलाईन माहिती अपलोड केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळांचा दर्जा समजावा यासाठी शाळा सिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानुसार शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात येत होते, परंतु उपक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत शाळांचे बाह्यमूल्यमापन झाले नव्हते. या वर्षी राज्यातील 11 हजार 851 शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून 330 शाळा निवडण्यात आल्या आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळासिद्धी उपक्रमातून (2020-21) शाळांचे स्वयंमूल्यमापन झाले. आता त्याच शाळांमधून प्राथमिक स्तरावरील 10 हजार आणि माध्यमिक स्तरावरील एक हजार 851 शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात यात प्राथमिकच्या 278, तर माध्यमिकच्या 52 शाळा आहेत. या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यासाठी शाळा व निर्धारक निश्चित करण्यात येणार आहेत. त्या निर्धारकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी प्रतिशाळा 490 रुपये निधी निर्धारकांना दिला जाईल.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …