Friday , September 22 2023

मन की बातमुळे जनआंदोलन उभे राहिले : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा रविवारी (दि. 30) 100वा भाग प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला, तसेच भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले.
शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्र वाचून माझे मन भावूक झाले. मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत खरे अभिनंदनाचे पात्र मन की बातचे श्रोते आहेत.  मी जास्तीत जास्त पत्र वाचण्याचा प्रयत्न केला. मन की बातच्या माध्यमातून जनआंदोलन सुरू झाले. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचे मिशन मन की बातनेच सुरू झाले. आपले भारतीय श्वान म्हणजेच, देशी श्वानांबाबत जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बातने झाली. यासोबतच गरीब आणि लहान दुकानदारांशी भांडण न करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. अशाप्रकारे प्रत्येक समाजात परिवर्तनाचे कारण मन की बात बनली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आठवण सांगितली. ते म्हणाले, 3 ऑक्टोबर 2014 हा विजयादशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून विजया दशमीच्या दिवशी ’मन की बात’चा प्रवास सुरू केला. विजयादशमी म्हणजेच, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, ’मन की बात’ हादेखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे.

मुंबई-विलेपार्लेमधील म. ल. डहाणूकर महाविद्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100व्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजेरी लावली. या वेळी मिुंख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

 

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply