Breaking News

पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्‍यांची दादागिरी

प्रवाश्यांना नाहक त्रास

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्‍यांकडून प्रवाश्यांची अडवणूक केली जात आहे. त्यांना हाकलणार्‍या रेल्वे सुरक्षा जवानांचा व्हिडिओ काढून अत्याचार करीत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर टाकणार्‍यांमुळे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान हतबल झालेत. त्यामुळे प्रवाशांना मात्र आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या पनवेल स्टेशनवरून   कोकण, गोवा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि नागपूरकडे जाणार्‍या गाड्या ये-जा करीत असतात. या गाड्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवाशी पनवेलला येतात. या प्रवाश्यांना भिकारी कुटुंबे अडवून भीक दिल्या शिवाय सोडत नसल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. दोन दिवसा पूर्वी एका महिलेला उतरताना अडवून ठेवली तर लिफ्ट जवळ ही प्रवाश्यांना अडवण्याचे प्रकार घडत आहेत त्यांना एखाद्या प्रवाश्याने मारल्यास पोलिसांत तक्रार करण्याची ही ते धमकी देत असल्याचे काही प्रवाश्यांनी सांगितले.

रेल्वेचे वाणीज्य व्यवस्थापक सुधीर कुमार यांनी सांगितले  की याबाबत  प्रवाश्यांच्या तक्रारी  आल्यावर मी रेल्वे  सुरक्षा बलाच्या अधिकार्यांना पत्र दिले. आमच्या मिटिंग मध्ये ही या विषयावर चर्चा होते . रेल्वे  सुरक्षा बलाचे जवान त्यांच्यावर कारवाई करतात व  त्यांना  फलाटावर येताना दिसल्यास  हाकलतात, पण स्टेशनच्या चारी बाजूंना प्रवेश करण्यासाठी जागा असल्याने ते पळून जातात आणि दुसर्या बाजूने आत येतात. स्टेशन बाहेर तयार झालेल्या झोपडपट्टीतील गर्दूले, महिला व लहान मुलांचा या मध्ये समावेश आहे. त्यांना मारल्यास रेल्वे सुरक्षा जवानांचा व्हिडिओ काढून अत्याचार करीत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर टाकला जातो.

आम्ही सुरतहून पनवेलला आलो. पनवेल स्टेशन उतरत असताना अचानक दरवाजात भिकार्‍यांच्या ग्रुपने आम्हाला घेरले पैसे द्या, नाहीतर उतरून देणार नाही असे म्हणत अडवून ठेवले. जवळ पास पोलीस नसल्याने आम्ही पैसे देऊन सुटका करून घेतली. -हेतल मेथा, बेलापूर

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply