पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करीत गोळीबारही केल्याची घटना सोमवारी (दि. 13) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.
लक्झरी बसमधील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली. वृद्ध, महिला यांनाही या लोकांनी सोडले नाही. एका एका प्रवाशाला चार-चार ते पाच जण मारहाण करीत होते. सोडवायला गेलेल्या इतर प्रवाशांचे दागिनेही लुटण्यात आले आहेत. लुटालुट झाल्याने लक्झरी बस आणि त्यातील प्रवासी तिथेच थांबले. हे प्रवासी दापोलीवरून बोरीवलीला जात होते. या वेळी तीन ते चार गाड्यांमधून आलेल्या 30-35 लोकांनी त्यांना मारहाण केली. गळ्यातील मंगळसूत्र, चैन, आदी गोष्टी या लोकांनी हिसकावून नेल्या. याबाबत दादर सागरी तपास करीत आहेत.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …