पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रविवारी (दि. 26) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. या वेळी या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
माजी विद्यार्थी मेळाव्यास मावळते अध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष विजय लोखंडे, जी. आर. पाटील, अतुल पाटील, गणेश कोळी, संजीवन म्हात्रे, उल्का धुरी, मिलिंद पाडगावकर, के. एस. पाटील, रवी पाटील, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उपप्राचार्य मंजुश्री बोबडे यांच्यासह प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी परेश ठाकूर यांचे अभिनंदन केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …