Breaking News

नवी मुंबईत गरीब रुग्णांचे हाल

नवी मुंबई : प्रतिनिधी

वाशी येथील मनपा रुग्णालयाचे तीनतेरा वाजल्यामुळे गरीब व गरजू नागरिकांचे हाल होत आहेत.विशेष म्हणजे उपचार घेण्यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे.

त्यामुळे मनपा प्रशासनाने  त्वरित प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी लेखी मागणी वाशी रुग्णालयात  आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी कार्यरत असणार्‍या आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी मनपा आयुक्त एन. रामस्वामी यांच्याकडे केली आहे. इतरही महत्त्वाच्या मागण्या आयुक्तांना दिलेल्या पत्रात मधुकर शिंदे यांनी नमूद केल्या आहेत. याबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply