उरण : वार्ताहर : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 843 संलग्न माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या वतीने दिनांक 18 मे 2019 रोजी उरण बौद्धवाडी येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2563 वी जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
शाखेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले, तसेच पोलीस उपनिरीक्षक तायडे साहेब, तसेच माता रमाई महिला मंडळ अध्यक्षा सुनीता सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानमध्ये पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
बौद्धाचार्य महेंद्र रघुनाथ साळवी यांनी धार्मिक पूजापाठ, बुद्धवंदना घेतली. सेक्रेटरी विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास शाखेचे कार्याध्यक्ष अनिल कासारे, सरचिटणीस रोशन गाडे, सहखजिनदार सुरेश गायकवाड, माजी अध्यक्ष चिंतामण गायकवाड, ज्येष्ठ सभासद मारुती तांबे, विलास मोहिते, विनोद कांबळे, हर्षद कांबळे, संजय पवार, विकास कांबळे, अजय कवडे, तसेच महिला मंडळाच्या सविता साळवी, षुष्पा कांबळे, सुजाता गायकवाड, सविता कासारे, सुनीता गायकवाड, चंद्रभागा जाधव, प्रतिभा कवडे, स्वप्नाली कवडे, अर्चना झुंमडे, गीता कांबळे, नलिनी गायकवाड हे उपस्थित होते.