Breaking News

गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेकडून 166 विशेष गाड्या सोडणार

पनवेल, कामोठे : प्रतिनिधी  : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण चार महिने आगोदरच फुल्ल होऊन या गाड्यांची प्रतीक्षा यादी पाचशेच्याही पुढे गेली. 29 आणि 30 ऑगस्टच्या मेल-एक्स्प्रेस फुल्ल झाल्यामुळे आता कोकणात जाणार्‍यांसाठी यंदा 166 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यांचे आरक्षण 25 मेपासून सुरू होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांसाठी कोकण रेल्वे फुल्ल झाल्याने मध्य रेल्वेने 166 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल आणि  पुणे येथून सोडण्यात येणार आहेत. या गाड्या करमाळी, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, पेरनेम, थिविम, झारापसाठी सोडण्यात येतील. त्यांचे आरक्षण 25 मेपासून सुरू होणार आहे. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड (26 विशेष गाड्या-गुरुवार व शनिवार सोडून) 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत ही गाडी सीएसएमटीतून मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल, तर सावंतवाडी येथून दुपारी 3 वाजता सुटणार आहे. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड (12 विशेष गाड्या-प्रत्येक गुरुवारी व शनिवारी सुटेल) 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यंत सीएसएमटीतून ही गाडी दर गुरुवारी व शनिवारी मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल आणि सावंतवाडीतून दुपारी 3 वाजता सुटणार आहे. सीएसएमटी ते रत्नागिरी ते पनवेल (40 विशेष गाड्या- दररोज धावणार) 28 ऑगस्ट ते 16 सप्टेंबपर्यंत ही गाडी सीएसएमटी स्थानकातून रत्नागिरीसाठी सकाळी 11.30 वाजता सुटेल, तर रत्नागिरीतून ही गाडी रात्री 10.50 वाजता पनवेलसाठी सुटणार आहे.

पनवेल ते सावंतवाडी रोड ते सीएसएमटी (40 विशेष गाड्या- दररोज धावणार) 29 ऑगस्ट ते 17 सप्टेंबपर्यंत ही गाडी पनवेल येथून सावंतवाडीसाठी दररोज रात्री 10 वाजता सुटेल, तर सावंतवाडी येथून सीएसएमटीसाठी ही गाडी दुपारी 12.25 वाजता सुटणार आहे. एलटीटी ते पेरनाम (सहा विशेष गाड्या- फक्त शुक्रवारी) 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबपर्यंत ही गाडी दर शुक्रवारी एलटीटीतून मध्यरात्री 1.10 वाजता सुटेल आणि पेरनेम येथून दुपारी 3.10 वाजता सुटणार आहे. पनवेल ते सावंतवाडी रोड (आठ विशेष गाड्या- प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी) 3 ऑगस्ट ते 13 सप्टेंबपर्यंत ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पनवेल येथून रात्री 11.45 वाजता सुटेल आणि प्रत्येक शनिवारी सावंतवाडीतून सकाळी 10 वाजता सुटणार आहे. पनवेल ते थिविम ते एलटीटी (आठ विशेष गाड्या- प्रत्येक शनिवार व रविवार) 24 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यंत ही गाडी शनिवारी पनवेलमधून थिविमसाठी रात्री 9 वाजता सुटेल आणि प्रत्येक रविवारी सकाळी 11.30 वाजता थिविममधून एलटीटीसाठी सुटणार आहे. पनवेल ते सावंतवाडी रोड ते एलटीटी (दोन विशेष गाड्या) 1 सप्टेंबर रोजी पनवेल येथून रात्री 8 वाजता गाडी सुटेल, तर सावंतवाडीतून 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता गाडी सुटणार आहे.

एलटीटी ते झाराप (सहा विशेष गाड्या- प्रत्येक सोमवारी) 2 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत ही गाडी प्रत्येक सोमवारी एलटीटीतून मध्यरात्री 1.10 वाजता सुटेल आणि झाराप येथून दुपारी 3.30 वाजता सुटणार आहे. एलटीटी ते झाराप ते पनवेल (आठ विशेष गाड्या- प्रत्येक गुरुवार व शुक्रवार)

22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबपर्यंत एलटीटीतून प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता सुटेल आणि 23 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरपर्यंत झाराप येथून प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11.10 वाजता सुटेल. याशिवाय पुणे ते रत्नागिरी (व्हाया कर्जत, पनवेल- सहा विशेष गाड्या- प्रत्येक गुरुवार व शुक्रवार) 29 ऑगस्ट ते 13 सप्टेंबपर्यंत ही गाडी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजता पुणे येथून सुटेल, तर 30 आगॅस्टपासून रत्नागिरीतून प्रत्येक शुक्रवारी सकाळी 8 वाजता गाडी सुटणार आहे. पुणे ते करमाळी ते पनवेल (दोन विशेष गाड्या) 30 ऑगस्ट रोजी पुणे येथून दुपारी 12.10 वाजता करमाळीसाठी सुटेल. 31 ऑगस्ट रोजी करमाळीतून पहाटे पावणेसहा वाजता पनवेलसाठी गाडी सुटणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply