Friday , September 22 2023

उरण विधानसभा मतदार संघातून 50 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
उरण : बातमीदार
उत्तर रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा 50वा वाढदिवस पोसरी कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
या वेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संघटक कृष्णा बा. पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली उरण तालुका व उरण मतदारसंघातून विविध विभागातून विविध सामाजिक पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश प्रक्रियेत उरण शिवसेना तालुकाप्रमुख अदिनाथ भोईर, गव्हाण विभागीय प्रमुख, प्रभाकर पाटील, संपर्कप्रमुख राजन म्हात्रे, जासई विभाग प्रमुख वैभव पाटील, रोहन कडू, चिरनेर विभागीय प्रमुख विजय पाटील, सचिन पाटील, तरघर शाखाप्रमुख संतोष मोकल, मोहा शाखाप्रमुख धनंजय कोळी, सह अनेक मान्यवर पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली. तर उलवे नोडमधील विविध व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांनी संतोष चौधरी, दत्ता ओझा, व शुभम दुबे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले आहे.तर मतदार संघाचे संघटक कृष्णा पाटील यांनी स्वागत करून प्रवेश करणार्‍या शिवसैनिकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply