माणगांव : प्रतिनिधी
सायबर कॅफेमध्येे काम करणार्या महिलेची गुगल पे या यूपीआय अॅपवरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.44 वा. च्या सुमारास फिर्यादी पायल महादेव तांबे, व्यवसाय- सायबर कॅफेमध्ये नोकरी, रा. हातकेली, पो. होडगाव या कामावरून घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर बँक ऑफ इंडिया शाखा माणगांव यांचेकडून बँक अकाऊंटमध्ये एकूण 2 लाख 25000 रुपये जमा रकमेपैकी 99 हजार 999 इतकी रक्कम पायल तांबे यांच्या गुगल पे अकाउंट नंबरवरून दुसर्या यूपीआय आयडीवर जमा झाल्याचा मॅसेज आला. त्यावेळी पायल तांबे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. गुगल पे कस्टमर मोबाईल क्र. 7478275674 यांनी विश्वास संपादन करून ही फसवूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. 95/2023 भा. दं. वि. सं. क. 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 (क) प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील करीत आहेत.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …