Thursday , March 23 2023
Breaking News

सिडकोचा कारभार होणार गतिमान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सिडकोच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार शहर सेवा विभागात महत्त्वपूर्ण खांदेपालट करण्यात आले, तसेच सिडकोच्या सेवेत नव्याने दाखल झालेले अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांच्यावर नवीन शहर विकास प्राधिकरण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोकण विभाग पुरवठा विभागाचे उपायुक्त दिलीप गुट्टे यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्याने शासनाने त्यांची सिडकोत बदली केली आहे, तसेच उपजिल्हाधिकारी असलेले एस. एस. सरवदे आणि अशोक मुंडे यांचीही सिडकोत बदली करण्यात आली. नव्याने सिडकोच्या सेवेत आलेल्या महसूल विभागातील या अधिकार्‍यांवर नवीन शहर विकास प्राधिकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहर सेवाची जबाबदारी एस. एस. सरवदे, तर फैय्याज खान यांच्याकडील शहर सेवाची जबाबदारी अशोक मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नैना क्षेत्राचा विकास, आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची जबाबदारी सध्या सिडकोच्या खांद्यावर आहे. कोकणातून हद्दपार झालेला नाणार प्रकल्प रायगडमध्ये उभारण्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी

जमीन संपादित करण्याची जबाबदारीही सिडकोवर सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार महत्त्वाच्या विभागात लक्षणीय बदल केले जात आहेत.

महत्त्वाच्या विभागात सक्षम अधिकार्‍यांच्या नेमणुका करून कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यामार्फत सुरू आहे.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply