Breaking News

भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक रविवारी (दि. 23) सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या प्रदेश संयोजिका वर्षा भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा समन्वयक संध्या शारबिद्रे, मंजुषा कुद्रीमोती, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, माजी उपमहापौर व जिल्हा उपाध्यक्ष चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, मोनिका महानवर, हर्षदा उपाध्याय, कुसुम म्हात्रे, राजश्री वावे, नेत्रा पाटील, आरती नवघरे, प्रमिला पाटील, रूचिता लोंढे, संगीता कांडपाल, निता माळी, माजी जि.प. सभापती प्रिया मुकादम, मृणाल खेडेकर, सुजाता दळवी, वनिता पाटील, संगीता पाटील, आरती तायडे, गीता चौधरी, सुहासिनी शिवणेकर, सुजाता दळवी, शोभा काटे, साधना पवार, निर्मला घरत, स्नेहल गोगटे, स्वामिनी मांजरे, बिनिता घुमरे आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply