खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दि. 27) विचित्र अपघात होऊन सुमारे 11 वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ मुंबई लेनवर दुपारी 1च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचप्रमाणे मार्गावर ऑईल सांडले होते. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले, तर अपघातातील जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Tags Mumbai-Pune Express Accident
Check Also
नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत …