पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी रायगड विभागातून संस्थेच्या येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील उपक्रमशील शिक्षिका ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर यांनी या निवडीचे श्रेय त्यांचे खंबीर मार्गदर्शक आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त 9 मे 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच आजीव सेवक आणि लाईफ वर्कर यांचेमधून मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांची निवड करण्यात आली. लाईफ वर्कर यांच्यामधून संस्थेतील नवनाथ जगदाळे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर आणि ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड झाली. संस्थेच्या सर्वोच्च समजल्या जाणार्या मॅनेजिंग कौन्सिल अर्थात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदी निवड होण्याचा बहुमान ज्योत्स्ना ठाकूर यांना प्राप्त झाला आहे.
हा बहुमान प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जनरल बॉडी सदस्य परेश ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, माजी सचिव प्रिं. डॉ. गणेश ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते, संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, प्राचार्या मुक्ता खटावकर, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे तसेच ज्योत्स्ना ठाकूर यांचे पतीराज उद्योजक युवा नेते सुधीर ठाकूर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
या शिवाय विद्यार्थ्यी, शिक्षक, पालक तसेच संस्थेच्या अनेक पदाधिकार्यांपासून स्थानिक कार्यकर्ते, नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही सौ. ठाकूर यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.