Breaking News

युवा वॉरियर्स कबड्डी लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने जपान विरुद्ध पनवेल असा प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवयास मिळाला.
समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत कामोठ्यात युवा वॉरियर्स कबड्डी लीग ही विद्युत प्रकाशझोतातील स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 17) झाले. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत उपक्रमाला तसेच परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या प्रारंभी जपान विरुद्ध पनवेल या प्रेक्षणीय सामन्याने रंगत आणली.
कामोठे सेक्टर 6मधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्रांगणात युवा वॉरियर्स कबड्डी लीग खेळली जात आहे. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, ओबीसी उत्तर रायगड अध्यक्ष राजेश गायकर, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, दामोदर चव्हाण, तेजस जाधव, आदित्य भगत, अरुण भगत, नितेश पाटील, भाजप युवा नेते हॅप्पी सिंग, महेंद्र भोपी, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नाना मगदूम, भाजप सरचिटणीस सुशील शर्मा, लीगल सेलचे अ‍ॅड. जय पावणेकर, प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पुरुष गटात होत असून विजेत्या संघास 21 हजार 111 रुपये, उपविजेत्यास 15 हजार 111 रुपये, तर तृतीय क्रमांकास 11 हजार 111 रुपये आणि तिन्ही विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply