Breaking News

सीकेटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौर व शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी सांगितली प्रगतीची पंचसुत्री

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना प्रमुख पाहुण्या रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी स्वप्न, मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि श्रद्धा या पंचसूत्रीने आयुष्यात सतत प्रगती करा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास रायगड जि.प.चे सहाय्यक प्रशासन अधिकारी अशोक कुकरारे, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, माजी नगरसेविका राजश्री वावेकर अ‍ॅड. वृषाली वाघमारे, संस्थेेचे सचिव डॉ.एस.टी. गडदे, कार्यकारिणी सदस्य संजय भगत, गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता गोळे, द्रोणागिरी नोड येथील भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा काथे, पोयंजे विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एल. ठाकरे, सीकेटी उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, माध्यमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संतोष चव्हाण, प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, अजित सोनवणे, स्वाती पाटील यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी मनोगतात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशप्राप्ती कशी करता येते हे जीवनपट उलगडून विद्यार्थ्यांना सांगितले. या वेळी त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले, तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना उत्तुंग भरारी घेण्याचे आवाहन केले. स्वप्न पहा, पण अशी पहा की, जी आपल्याला झोपू देणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विशेष यश संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे यांनी केले. माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी आभार मानले. ताम्हणकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

पनवेल आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन

संविधानाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त न्याय, समता आणि …

Leave a Reply