पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत कामोठे येथे परेश ठाकूर चषक 2023चे रजनी क्रिकेट स्पर्धा रंगली. कामोठे सेक्टर 11 येथील बुद्ध विहार मैदानावर 27 व 28 मेदरम्यान ही स्पर्धा खेळली गेली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी नगरसेवक विकास घरत, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आणि खेळाडू उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
Check Also
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे
मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद …