Breaking News

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी रायगड जिल्हा दौर्‍यावर

अलिबाग ः प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी (दि. 30) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत.
मंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी सायंकाळी 4.15 ते 5 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज-3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द या 13 किलोमीटर रस्त्याची पाहणी करतील. त्यानंतर 5 ते 5.30 वाजता महामार्ग पॅकेज-2 भोगाव खुर्द ते मस्त मालवणी हॉटेल या 30 किमी रस्त्याची पाहणी, 5.30 ते सायंकाळी 6 वाजता मस्त मालवणी हॉटेल येथे आगमन व राखीव, 6 ते सायंकाळी 6.15 वाजता महामार्ग पॅकेज-2 मस्त मालवणी हॉटेल ते वडपाले या 10 किमी रस्त्याची पाहणी, 6.15 ते 7.15 वाजता महामार्ग पॅकेज-1 वडपाले ते इंदापूर या 26.75 किमी रस्त्याची पाहणी, 7.15 ते रात्री 10 वाजता इंदापूर ते पळस्पे या एनएचएआय विभागाच्या 84 किमी रस्त्याची पाहणी. (रात्री 9 वा. हॉटेल पॅट्री वा इच्छित स्थळी) करून रात्री 10 वाजता पळस्पे येथून मोटारीने डोंबिवली निवासस्थानाकडे मंत्रीमहोदय प्रयाण करतील.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply