एकलव्यनगर वाडीवर कातकरी उत्थान अभियानाचा शुभारंभ

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यामध्ये महाराजस्व अभियानास प्रारंभ झाला. त्या अंतर्गत दि. 16 डिसेंबर रोजी माणगाव तालुक्यातील एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडी येथे कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. या वेळी माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर व तहसीलदार प्रियंका आयरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माणगाव तालुक्यामध्ये एकूण 98 कातकरी वाड्या असून सुमारे 20 हजार इतकी आदिवासी लोकसंख्या आहे. या कातकरी वाड्यांमध्ये शासनाच्या सर्व योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावणे, स्थलांतर रोखणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे, व्यसनाधीनता, बालविवाह रोखणे, तसेच रोजगारनिर्मिती करून आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे इत्यादी व्यापक उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियान अधिक गतिमान करण्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्वच आदिवासी वाड्यांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पालक अधिकार्‍यामार्फत वाडीचे संपूर्ण सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक आदिवासी वाडीसाठी एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

या अभियानाचा शुभारंभ चांदे एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडीवर झाला. या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या शिबिरामध्ये वयाचे दाखले 69, आधारकार्ड नोंदणी 11, वाहन परवाना 9, जॉबकार्ड 13, शिधापत्रिकेमध्ये नाव वाढविणे 26 इत्यादी लाभ देण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली व उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथील वैद्यकीय अधिकारी प्रदीप इंगोले व त्यांच्या पथकामार्फत आदिवासी बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तसेच कोविड 19 चे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले. या वेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुख, सर्व विकासदीप संस्थेचे संचालक रिची भाऊ व समन्वयक महेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply