पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.23) कोरोनाचे 326 नवीन रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 331 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 273 रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 220 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 53 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 111 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल प्रभात स्टुडिओ जवळ, नवीन पनवेल सेक्टर 18 रोड न.3, खांदा कॉलनी सेक्टर 11 उत्कर्ष सोसायटी, कळंबोली तिरुपती सोसायटी, कामोठे सेक्टर 11, आशियाना सोसायटी, सेक्टर 35 ध्रुव निकेतन सोसायटी, सेक्टर 18 प्राइज, खारघर सेक्टर 6 शहा अर्केड, सेक्टर 15 सेंट्रल जेल क्वार्टस आणि तळोजा पापडीचा पाडा येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2831 झाली आहे. कामोठेमध्ये 60 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3778 झाली आहे. खारघरमध्ये 68 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3561 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 60 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3182 झाली आहे. पनवेलमध्ये 49 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3087 झाली आहे. तळोजामध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 720 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 17159 रुग्ण झाले असून 14619 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.20 टक्के आहे. 2150 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 390 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 19 जणांना संसर्ग
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 19 नवे रुग्ण आढळले व 28 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये कोयाल नेवल स्टेशन दोन, अनुपमा नेवल स्टेशन दोन, डीएससी नेवल स्टेशन दोन, सारडे, कोळीवाडा मच्छीद जवळ, वशेणी, म्हात्रेवाडी, नेवल अपार्टमेंट एनएडी करंजा, कोप्रोली गणेश मंदिर जवळ, जांभूळपाडा, ओएनजिसी, अनुतोष कुंभारवाडा, विंधणे, द्रोणागिरी कॉलनी ओएनजिसी प्रशासन भवन, जेएनपीटी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ंतालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1774 झाली आहे. 1505 बरे झाले आहे. 182 रुग्ण उपचार घेत असून 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कर्जतमध्ये 17 कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात बुधवारी 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 1514 वर गेली आहे. तर एकूण 1254 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 67 वर गेली आहे.आढळलेल्या रुग्णांत कर्जत शहर पाटील आळी दोन, कर्जत शहर, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द, दहिवली, गजानन दर्शन इमारत, पोशिर, किरवली, मानिवली, नेरळ दामत, आंबिवली, सांडशी, नेरळ खांडा, देऊळवाडी, कशेळे, कळंब येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महाडमध्ये 18 जणांना लागण
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये बुधवारी कोरोनाचे 18 नवे रुग्ण आढळून आले असून, 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नांगलवाडी चार, बिरवाडी तीन, भिवघर, महाड, गवळआळी प्रत्येकी दोन, ढालकाठी, नातोंडी, करंजखोल, पाचाड, दासगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर करंजखोल येथील रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. महाडमध्ये 122 रुग्ण उपचार घेत असून 1371 रुग्ण बरे झाले आहेत, तर 57 जणांचा मृत्यू झाला आहे व आतापर्यंत 1550 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.