Breaking News

वीज बिलमाफीसाठी भाजप आक्रमक; मुरूडमध्ये आज बिल दहन आंदोलन

मुरूड : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जनता त्रस्त असून, दोन महिने काही ठिकाणी  विद्युतपुरवठा सुरळीत नसतानाही महावितरणने वाढीव वीज बिले आकारली आहेत. राज्य सरकारच्या या अनागोंदी कारभाराविरोधात आणि वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत, या मागणीसाठी मुरूडमध्ये सोमवारी (दि. 7) वीज बिल दहन आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात रविवारी भाजपची बैठक झाली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष मिलिंद पाटील, वैकुंठ पाटील, ज्येष्ठ नेते जनार्दन तथा अण्णा कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड शहरातील भाजप कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी अ‍ॅड. महेश मोहिते म्हणाले की, राज्य शासनाकडे अनेकदा निवेदन देऊनसुद्धा वीज बिल माफ केले जात नाही. यासाठी आता कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन आंदोलन करण्याची गरज आहे. तेव्हा सोमवारी मुरूड येथील महावितरण कार्यालयात जमा होऊन वीज बिलांची होळी करा. तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी सांगितले की, मग्रूर शासनाने वीज बिल माफ केल्याशिवाय कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये, तर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शासनाच्या धोरणाचा निषेध करणे आवश्यक असल्याचे मत अण्णा कंधारे यांनी व्यक्त केले. या बैठकीस जिल्हा सदस्य शैलेश काते, संघटक सरचिटणीस प्रवीण बैकर, उपाध्यक्ष कृष्णा किंजळे, विनोद भगत, शहर अध्यक्ष उमेश माळी, धनेश गोगर, सरचिटणीस जीवन सुतार, महिला तालुका अध्यक्ष सुचिता घाग, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष नसीमा उलडे, अमीर खानजादे, महेश मानकर, संजय भायदे, अनिल कारभारी, जनार्दन खोत, काशिनाथ गाणार, गणेश कट, सुनील पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रोहन खोपकर, अभिजित पानवलकर, नयन कर्णिक, नैनिता कर्णिक आदी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply