Breaking News

पनवेलमधील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा

पनवेल ः वार्ताहर
पनवेल शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू होते. 90 टक्के कामसुद्धा पूर्ण झाल्यावर उर्वरित निधीसाठी काम गेली अनेक वर्षे रखडले होते, परंतु भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती आली असून येत्या पाच महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. पनवेल पोलीस ठाण्यासह इतर शासकीय कार्यालये एका छताखाली येणार असल्याने नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे.
पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील अस्तित्वातील इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन तहसील कार्यालयाकरिता प्रशासकीय इमारत बांधणे अशा स्वरूपाचा प्रस्ताव 6 मार्च 2012 रोजी शासनातर्फे मंजूर करण्यात आला होता. त्याप्रमाणे तहसील कार्यालय, शहर पोलीस ठाणे व उपकोषागार कार्यालय अशी कार्यालये समाविष्ट असलेल्या नकाशांस मंजुरी प्रदान करण्यात आली व सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवातसुद्धा करण्यात आली. शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकिय भवन उभारण्याचे काम सुरू होते. 90 टक्के काम पूर्ण झाल्यावर उर्वरित निधीसाठी काम गेली अनेक वर्षे रखडले होते, परंतु आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती आली असून येत्या पाच महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होणार आहे.

  • हा आहे प्रशासकीय भवनाचा आराखडा ः
    या भवनाकरिता 9,81,80,500 इतका खर्च अपेक्षित आहे. त्याकरीता 36 महिन्यांचा कालावधी करारनाम्यात ठरला आहे. तळमजल्यावर पोलीस ठाण्याला, पहिल्या मजल्यावर कोषागार, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, रेकॉर्ड, स्ट्रॉग रूमचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी शौचालयाची सोय करण्यात येणार आहे. दुसर्‍या मजल्यावर तहसीलदार, नायब तहसीलदारांना दालन, तलाठी कार्यालय, ऑडिटोरियम, व्हीआयपी रूम, अँटी चेंबर, तहसीलदार कोर्ट आणि प्रतीक्षालयाची व्यवस्था असेल.

प्रशासकीय भवनांचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते, परंतु लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागातर्फे पाठपुरावा केल्यावर आता उर्वरित इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या चार ते पाच महिन्यात ही वास्तू आमच्याकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
-विजय तळेकर, तहसीलदार

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे …

Leave a Reply