Breaking News

पंडित पाटील यांच्या वक्तव्यामुळे अलिबागेतील ओबीसी मोर्चात गोंधळ

अलिबाग : प्रतिनिधी

इतरमागसवर्गीय सामजाला (ओबीसी) आरक्षण तसेच  विकासनिधी त्यांच्या लोकसंख्येनुसार मिळायला हवा. देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चातर्फे शुक्रवारी (दि. 18) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र माजी आमदार पंडित पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या मोर्चात गोंधळ उडाला. ओबीसींच्या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. कोणत्या पक्षाचे नेते हजर नाहीत हे तुम्हीच ओळखा, असे माजी आमदार पंडित पाटील म्हणाले. त्यावेळी गर्दीतून कुणीतरी ’खोके’ असे ओरडला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी व्यापिठावर जाऊन पंडित पाटील यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. माईक खेचण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोधळ निर्माण झाला होता. वातावरण तंग झाले होते.  व्यापिठावरील नेत्यांनी समजूत काढल्यानंतर हे कार्यकर्ते शांत झाले. कुणीही राजकीय वक्तव्य करू नये, अशी समज मार्चाच्या आयोजकांनी पंडित पाटील यांना दिली. अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यला अभिवादन करून हा मार्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. स्टेट बॅकेजवळ मोर्चा अडविण्यात आला. तेथे या मार्चांचे सभेत रूपांतर झाले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सदर केले. ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश (अण्णा) शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, रायगड जिल्हा अध्यक्ष सूरेश मगर, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी पालकमंत्री अदिती तटकरे, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धौर्यशील पाटील, माणगावचे  नगराध्यक्ष ज्ञानदेव पावार, सुरेंद्र म्हात्रे, अ‍ॅड. आस्वाद पाटील, शंकराव म्हसकर आदी या मार्चात सहभागी झाले होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply