Breaking News

पेणमध्ये सफाई, अग्निशमन दल कर्मचार्यांचा गौरव

पेण : प्रतिनिधी

महाडमधील पूरग्रस्त भागात साफसफाईचे काम केलेल्या पेण नगर परिषदेच्या सफाई व अग्निशमन दल कर्मचार्‍यांचा येथील रोटरी क्लबच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. महाडमधील पूरग्रस्तांसाठी पेण नगरपालिका कर्मचार्‍यांनी केलेले काम मोलाचे असल्याचे गौरवोद्गार रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शिगवण यांनी या वेळी काढले.

अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र पुराचे पाणी भरून दुरवस्था झाली होती. पुर ओसरल्यानंतर पेण नगर परिषदेच्या 40 सफाई कामगार व अग्निशमन दलाचे 16 कर्मचार्‍यांनी 15 दिवस महाड येथे स्वच्छतेचे काम केले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या कर्मचार्‍यांचा पेण रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, सभापती तेजस्विनी नेने, नगरसेविका शहेनाज मुजावर, नगरसेवक दीपक गुरव, माजी सैनिक मिलिंद बोचरे, नितेश शहा, जयेश शहा, अशोक जैन, अशोक जैन, अश्विनी शहा, वर्षा शिगवण, सुप्रिया चव्हाण, हिमांशू कोठारी, प्रकाश पाटील या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply