कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली परिसरामधील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची पाहणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत ती लवकरात लवकत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली सेक्टर 5 ए के एल 1 या ठिकाणी गेल्यावर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्या अनुषंगाने यावर्षी कळंबोली सेक्टर 5 ए के एल 1 या ठिकाणी नाले, ड्रेनेज सफाई करताना विशेष काळजी घेण्यात येत आहे. यांसह आजूबाजूच्या परिसरामध्येही पावसाळ्यात नाल्याचे पाणी तुंबून नागरिकांना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी शहरात नालेसफाईची कामे सुरू आहेत.
या कामांची भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस दिलीप बिस्ट तसेच भाजप कार्यकर्ते यांनी पाहणी करून कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यातचे निर्देश दिले. या वेळी पनवेल महापालिकचे स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, अधिकारी वर्ग, कामगार वर्ग उपस्थित होता.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …