Tuesday , February 7 2023

पाणी समस्या त्वरित सोडवा; अन्यथा आंदोलन

खारघर भाजपचा सिडकोला इशारा

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. यात काल उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत झालेले पाण्याचे वितरण या संदर्भात सिडकोला जाब विचारण्यासाठी व निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाच्या कार्यकर्त्यांनी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयात धडक दिली. चर्चेदरम्यान एका आठवड्यात यावर कायमस्वरूपी समाधानकारक निर्णय झाला नाही, तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाकाली उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या वेळी नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील, प्रभाग समिती-अ सभापती अनिता पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजीभाई बेरा, अ‍ॅड. नरेश ठाकूर, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सोशल मीडिया सहसंयोजक मोना अडवाणी, उपाध्यक्षा बिना गोगरी, समीर कदम, युवा सरचिटणीस अमर उपाध्याय, प्रभाग 4 अध्यक्ष वासुदेव पाटील, महिला सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, अश्विनी भुवड, सीमा खडसे, अजय माळी, योगी कोट्टरी, राजेंद्र प्रभू इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते अपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply