पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक योग दिनानिमित्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत युवा व ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्यात माची प्रबळगड येथे योगासने केली. या वेळी त्यांच्या चेहर्यावर वेगळेच समाधान दिसून आले.
या वेळी पनवेल येथील इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती यांच्या वतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके यांनी योगसंदर्भात मार्गदर्शन केले, तर योगसाधक अरविंद गोडबोले, नैना म्हात्रे, सारिका शेलार, श्रुती शेलार यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा व पुढाकाराने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून दरवर्षी जगभर साजरा करण्यात येतो. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला. योगसाधनेतून मिळणार्या अनन्यसाधारण लाभांमुळे आज योग सर्वत्र लोकप्रिय आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने माची प्रबळगड येथे योग दिन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, सुभाष पाटील, अमोघ प्रशांत ठाकूर, आदेश परेश ठाकूर, वारदोली ग्रामस्थ तसेच राकेश भुजबळ, हर्षवर्धन पाटील, सुमित झुंझारराव, अभिषेक भोपी, अक्षया चितळे, तेजस जाधव, अक्षय सिंग, साहिल नाईक, उदित नाईक, ऋषी साबळे, रोहन माने, शुभम कांबळे, अमेय देशमुख, श्रावण घोसाळकर, तेजस जाधव, देवांशू प्रबाळे तसेच युवा व ज्येष्ठ मंडळींनी योगासने केली.
मागील काही वर्षांमध्ये योगसाधनेकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस चालला आहे. सर्व जगाला जोडण्याची ताकद योगशास्त्रामध्ये आहे. आपण सर्वांनी भारतीय परंपरेने आपल्याला प्राप्त झालेल्या या शास्त्राचा आदर करून त्याचे आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्व ओळखून योग जीवनशैली आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे आणणे गरजेचे आहे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत
योग दिन साजरा करण्याचा योग अनेकांनी अनुभवला.
Check Also
पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …