Breaking News

तळोजा फेज 1मधील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी

भाजपच्या पाठपुराव्यामुळे नवी टाकी कार्यान्वित

पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा फेज 1 येथील पाण्याची टाकी कार्यान्वित झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप नेत्यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तब्बल पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अपुर्‍या तसेच कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या तळोजा फेज 1 मधील रहिवाशांची प्रतीक्षा यामुळे संपली असून नव्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होणार असल्याने येथील रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.
तळोजात कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्यामुळे अनेक सोसायट्यांपर्यंत ते पोहचत नव्हते. या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते प्रल्हाद केणी तसेच माजी नगरसेवक हरेश केणी यांनी पाठपुरावा करून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागासोबत बैठका घेतल्या. भाजप नेत्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सेक्टर 8 येथील पाण्याची टाकी शुक्रवार (दि. 5)पासून कार्यान्वित झाली आहे.
तळोजा फेज 1मध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाच एमएलडी पाण्याची गरज आहे. थेट सिडको या ठिकाणी पाणीपुरवठा करीत नाही. नव्याने कार्यान्वित झालेल्या टाकीमुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असल्याने शहरात जादा दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी चेतन देवरे यांनी दिली. तळोजा फेज 1, 2 या ठिकाणची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिडकोला त्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. आम्ही याबाबतदेखील पाठपुरावा करीत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक हरेश केणी यांनी या संदर्भात बोलताना दिली.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply