Breaking News

ज्येष्ठ कार्यकर्त्यांमुळेच आज आम्ही आहोत -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जतध्ये ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन उत्साहात

कर्जत, खोपोली : प्रतिनिधी
गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारताची मान सर्वदूर उंचावली आहे. अमेरिकेसारख्या देशात त्यांना सन्मान मिळत आहे. त्यांनी सर्वांसाठीच विविध योजना सुरू केल्या आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळू लागला. भारतीय जनता पक्षाच्या कठीण काळात ज्या कार्यकर्त्यांनी काम केले त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमुळेच आम्हाला पदे मिळाली आहेत, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.
भाजपच्या वतीने महिला मंडळाच्या सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन बुधवारी (दि. 21) करण्यात आले होते. कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, अविनाश कोळी, रेल्वे समिती सदस्य दुबे, महिला मोर्चाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस राजेश भगत, खोपोली मंडल अध्यक्ष रमेश रेठरेकर, सरचिटणीस हेमंत नांदे, नगरसेवक बळवंत घुमरे, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक अविनाश कोळी, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे, कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महाअभियान समन्वयक हेमंत नांदे, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, खोपोली महिला मोर्चाध्यक्ष शोभा काटे, कर्जत मंडल सरचिटणीस राजेश भगत, कर्जत मंडल सरचिटणीस संजय कराळे. कर्जत नगरपरिषद नगरसेविका बिनिता घुमरे, कर्जत तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले, 2014च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळाले मोदीजी पंतप्रधान झाले. त्यांनी जाहिरनाम्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली व जनतेचा विश्वास मिळवला. तरीही 2014 मध्ये भाजपाला 200 ही जागा मिळणार नाहीत असे अंदाज प्रसार माध्यमांनी केली होती. ती सर्व फोल ठरवून निर्विवाद बहुमत आपल्याला मिळाले. पूर्वीचे पंतप्रधान परदेशात दौर्‍यावर जाताना पत्रकारांना मोठ्या संख्येने नेट असत. मग पत्रकार परिषद झाली की हेच पत्रकार कुठेतरी कोट्यातला फ्लॅट मिळावा किंवा एखाद्या अधिकार्‍याची बदली करून द्यावी. असे सांगून काम साधून घेऊन कोट्यवधी रुपये
मिळवत असत. तसेच या सर्वाचा खर्चही खुप होत असे परंतु आता तसे नाही. मोदीजी कुणालाही नेट नाहीत व कमी वेळात जास्त दौरे ते करीत आहेत. त्यांना परदेशात मिळालेल्या भेटवस्तूंचा ते
लिलाव करतात आणि ती रक्कम सैनिक कल्याण निधीमध्ये टाकतात. ही आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे.
या संमेलनात जेष्ठ कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुनील गोगटे, शर्वरी कांबळे, अरविंद शेलार, माधवराव गायकवाड, दिनू पुराणिक, रवींद्र खरादे, मंदार मेहेंदळे, स्नेहा गोगटे आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply