Breaking News

प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये महारोजगार मेळावा

मंत्री उदय सामंत, मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवारी (दि. 24) महारोजगार मेळावा होणार असून या वेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
भूमिपुत्रांचे दैवत दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम शनिवारी सकाळी 9 वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात होणार आहे.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कॉ. भूषण पाटील, समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply