पनवेल : रामप्रहर वृत्त
दुबईच्या धर्तीवर न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या रामबागमध्ये रविवारी (दि. 8) रीदम अॅण्ड रायम या गु्रपच्या वतीने लाईव्ह म्युझीकल इव्हेंट या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेातून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी मस्वर्गसुख आनंद देणारी रामबाग साकारली आहे. 14 एकर जागेतील या रामबाग उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पाँईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक या ठिकाणी आहेत. सायंकाळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. तसेच दिवसेंदिवस नगरीकांच्या गर्दीने रामबाग अधिकाधिक फुलत आहे. त्यापार्श्वभुमीवर रविवारी रीदम अॅण्ड रायम या गु्रपच्या वतीने संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याला नागरीकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …