Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खांदा कॉलनी, कामोठ्यात पाहणी

नागरी सोयीसुविधांसंदर्भात अधिकार्‍यांना सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 7) खांदा कॉलनी आणि कामोठे वसाहतीत विविध नागरी सोयीसुविधा, तसेच प्रश्नांसंदर्भात पाहणी करून अधिकारीवर्गाला आवश्यक त्या सूचना केल्या.

कामोठे येथील पाहणीवेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, जगदिश गायकवाड, विकास घरत, दिलीप पाटील, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील, भाऊ भगत, रवींद्र जोशी, रवी गोवारी, रमेश गोवारी, रमेश तुपे, जयकुमार डिगोले, अनिल केंद्रे, आदित्य भगत, आर. जी, म्हात्रे, सीताराम राखडे, गोपीनाथ गोवारी, जयश्री धापते आदी उपस्थित होते.

खांदा वसाहतीतील पाहणी दौर्‍यात प्रभाग समिती ‘ब‘चे सभापती संजय भोपी, नगरसेविका सीता पाटील, मोतीराम कोळी यांसह स्थानिक रहिवासी व फेरीवाल्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply