Breaking News

शुभम चवरकरला उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्कार

रेवदंडा : प्रतिनिधी
साळावमधील शिव मर्दानी आखाड्याचा मल्लखांबपटू शुभम किशोर चवरकर याला छावा प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात आले आहे.
वस्ताद अमित गडांकुश संस्थापक-अध्यक्ष असलेल्या छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच छावा प्रतिष्ठानच्या वतीने साळाव येथील शुभम चवरकर याची रायगडमधील उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू 2021 या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे रविवारी (दि. 31) झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शुभमला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साळावमध्ये शिव मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून अनेक मल्लखांबपटू शुभम चवरकर याच्यासह शिवकालीन मल्लखांब प्रशिक्षण घेत असून, ठिकठिकाणी त्यांनी मल्लखांबचे प्रात्यक्षिकसुद्धा केले आहे. या आखाड्यास शुभमचे आजोबा कै. महादेव चवरकर व वडील किशोर चवरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पुरस्काराबद्दल शुभमचे अभिनंदन होत आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply