Breaking News

खोपोलीजवळील धाकटी पंढरीत हजारो भाविक दाखल आषाढीनिमित्त संतांचा मेळा अवतरला

खोपोली : प्रतिनिधी
खोपोलीजवळील ताकई-साजगांव येथील धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात गुरुवारी (दि. 29) साजर्‍या होणार्‍या आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक बुधवारीच दाखल झाले आहेत. वारकरी व सर्वसामान्य भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून धाकटी पंढरी देवस्थान समितीकडून आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी सांगितले.
आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात, मात्र रायगड जिल्ह्यातील ज्यांना पंढरीला जाण्याचे शक्य होत नाही, असे हजारो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी धाकटी पंढरीला येतात. जगत्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात आषाढी एकादशी तसेच इतर दिवशीही भाविकांची वर्दळ सुरू असते. गुरुवारी सकाळी 4 वाजता यथोचित महापूजा व काकड आरती झाल्यावर दर्शनासाठी हे मंदिर खुले होईल. साधारण 50 हजारच्या वर भाविक आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी येतील, असा अंदाज देवस्थान कमिटी व व्यवस्थापकांना आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प

पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ पनवेल : रामप्रहरविधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय …

Leave a Reply