Breaking News

कामोठ्यात लवकरच जलकुंभ

नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठ्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केलेल्या मागणी व सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच या संदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

आमदार प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना कामोठे येथील पिण्याच्या पाण्यासंदर्भात नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत कामोठ्यात जलकुंभ उभारण्याची मागणी केली होती. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती. या वेळी तत्कालीन अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही मागणी मान्य करीत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तशा सूचना केल्या होत्या.

सिडकोकडून हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला. नुकताच त्यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता बनकर यांना या कामासंदर्भात विचारणा केली असता येत्या एक ते दीड महिन्यात एमबीआर अर्थात जलकुंभ उभारण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात येऊन काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या एमबीआरला हेटवणे लाइन जोडण्यात येणार असून दोन सेशनमध्ये पाणी वितरण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

कामोठेमधील नागरिकांना सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोकडे पाठपुरावा करीत आहे. सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी तत्काळ मान्यता देऊन या कामासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या. कोविड व इतर तांत्रिक कारणांमुळे मधल्या काळात थोडा उशीर झाला, पण अखेर या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर व सिडको अधिकार्‍यांचे मी आभार मानतो.

-डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply