Breaking News

आंबेनळी घाटात दरड कोसळली

तब्बल दहा तासांनंतर वाहतूक सुरळीत 

पोलादपूर : प्रतिनिधी
आंबेनळी घाटात मंगळवारी (दि. 27) रात्री 11.30 वा. च्या सुमारास दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी (दि. 28) सकाळी दरड हटविण्याचे काम पूर्ण करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे, आंबेनळी घाटात कालिका मंदिराजवळ मंगळवारी रात्री ही दरड कोसळली. याबाबतची माहिती मिळताच, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, मात्र रात्रीच्या काळोखात दरड हटविण्याचे काम करणे शक्य नसल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
बुधवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दरड हटवण्याचे काम तातडीने सुरू केले. पावसामुळे पाण्यासोबत लहान-मोठे दगड आणि मातीचे ढिगारे ओघळून खाली येत होते. जेसिबीच्या साहाय्याने हे ढिगारे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. रस्ता मोकळा झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने घाट मार्गावरून प्रवास करतांना वाहन चालकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Check Also

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट …

Leave a Reply