पनवेल : रामप्रहर वृत्त
प्राणवायूसाठी वृक्षसंपदा आवश्यक आहे. याचाच विचार करून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि महापालिकेच्या वतीने शहरातील लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटलशेजारी असलेल्या भूखंडावर मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट (घनदाट जंगल) आणि बाग हा प्रकल्प साकारला आहे. ‘रोटरी’चे मार्गदर्शक डॉ. गिरीश गुणे यांचे संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या नामफलकाचे अनावरण महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि ‘रोटरी’चे डिस्ट्रीक्टर जनरल नॉमिनी डेसिग्नेट संतोष मराठे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 30) करण्यात आले.
या सोहळ्यास ‘रोटरी’चे डिस्ट्रीक्टर गव्हर्नर डॉ. अनिल परमार, माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव अनिल ठकेकर, प्रोजेक्ट चेअरमन सुदीप गायकवाड, सुनील गाडगीळ, ऋषिकेश बुवा, डॉ. रमेश पटेल, दीपक गाडगे, रतन खरोळ, अनिल ठकेकर, शैलेश पोटे, योगेंद्र कुरघोडे, संतोष घोडिंदे, योगेश महाजन, पुष्पलता पाटील, ज्योती गाडगे, वृषाली पोटे, तनुजा मराठे, श्वेता वारंगे आदी उपस्थित होते. शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे साकारलेल्या या प्रकल्पामुळे वनीकरणाला चालना मिळणार आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …