Breaking News

कळंबोलीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शिक्षकांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त
वरिष्ठांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि आई-वडिलांचे पाठबळ कायम राखत मोठी झेप घ्या, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सत्कार समारंभात बोलत होते.
नवरत्न युवा संघटनेच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा कळंबोली येथील नवीन सुधागड हायस्कूल हॉलमध्ये रविवारी (दि. 2) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट देत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केले.
या गौरव सोहळ्यास भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेविका मोनिका महानवर, संघटनेचे अध्यक्ष सचिन केकाण, दिपाली केकाण, उपाध्यक्ष वैभव बाबर, कामोठे शहर महिला अध्यक्ष शुभांगी गोरे, भाजप नेते बबन बारगजे, प्राचार्य राजेंद्र सर, देविदास खेडकर, गणेश वर्तक, युवा उद्योजक भरत नारणवर, बबन पवार, सचिन मोटे यांच्यासह पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संघटनेच्या माध्यमातून होत असलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल अभिनंदन केले तसेच या सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही बहुमोल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती
पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे, तर शिक्षकांनी यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
यांनी सांगितले.

आजची पिढी ही जगाच्या पाठीवर कुठेही राज्य करू शकते, मात्र मुलांच्या चुका पडद्याआड करू नका. त्यांना चांगल्या वाटेला आणि दिशेला नेण्याचे काम हे पालक आणि शिक्षकांचे आहे.
-ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प

पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ पनवेल : रामप्रहरविधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय …

Leave a Reply