Breaking News

पनवेल महापालिकेचा मालमत्ता करवसुलीचा उच्चांक

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत 135 कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता करवसुली केली आहे. मालमत्ता कर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत 46 हजार 154 मालमत्ताधारकांनी 135 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाद्वारे सुविधा दिलेल्या डिजिटल माध्यमांमार्फत देयकांच्या संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे.
नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरता यावा तसेच महापालिकेच्या कार्यालयात ये-जा करावी लागू नये यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार मागील वर्षी पनवेल महानगरपालिकने पीएमसी टॅक्स अ‍ॅप विकसित केले होते. या अ‍ॅप तसेच महापालिका वेबसाइट www.panvelcorporation.comवरील लिंक अशा डिजिटल माध्यमातून देयक भरण्याच्या संख्येत दिवेंसेदिवस वाढ होताना दिसत आहे. डिजिटल पद्धतीने कर भरणा केल्यास दोन टक्के सूट असल्यानेही अशा प्रकारे देयके भरली जात आहेत. आतापर्यंतच्या एकूण संकलनापैकी सुमारे 41 हजार 824 नागरिकांनी एकंदर मालमत्ता करापैकी 110 कोटी रुपये डिजिटल पद्धतीने भरले आहेत.
नागरिकांना मालमत्ताकरांबाबत काही अडचणी असल्यास 18005320340 या टोल फ्री क्रमांकारवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा

आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी पनवेल ः प्रतिनिधी सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या …

Leave a Reply