Breaking News

खालापूरात मत्स्य विभागाची धडक कारवाई; मांगूर पालन करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

खालापूर ः प्रतिनिधी
तालुक्यात बेकायदा सुरू असलेल्या मांगूर मत्स्यपालन विरोधात खालापूरमधील ग्रामस्थ, शेतकरी शिवलिंग वाघरे यांच्यासह पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा मत्स्य विभागाने सोमवारी (दि. 10) महड, धामणी परिसरातील तलावावर धडवक कारवाई केली.
सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील, उपायुक्त चेतन निवलकर, सोनल तोडणकर, खोपोली सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी अजया भाटकर, पाटबंधारे विभागाचे भरत गुंटूरकर, मंडळ अधिकारी संदेश पानसरे, खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी निलेश कांबळे, हेमा कराळे, अक्षय अतिग्रे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी उत्तम माने, अभिजित तेली, आरोग्य निरीक्षक खोपोली नगरपालिका, विशाल गोयल, तक्रारदार शिवलिंग वाघरे, यांच्यासह मोठा फौजफाटा कारवाई दरम्यान उपस्थित होता.
पाताळगंगा नदीलगत हे तलाव असून मोठ्या प्रमाणात मंगूर माशांची पैदास केली जाते. नदीकिनारी असलेल्या या तलावातील पाणी गटारातील पाण्यापेक्षा घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे. तलावातील घाण पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाताळगंगा प्रदूषित होत आहे. तालुक्यातून वाढत्या तक्रारींची दखल सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांनी घेतली. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply