Breaking News

कळंबोलीत इमारतीचा भाग कोसळला

कळंबोली ः कळंबोली सेक्टर 3 ई येथील मोकळ्या जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग अचानकपणे कोसळल्याने परिसरातील रहिवाशांंमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे बाजूच्या सोसायटी आणि सिडकोच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही सिडको प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यासंदर्भात पनवेल महापालिकेचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

उरण ः महाराष्ट्रात काही भागात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पूरामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नागरिक अन्न वस्त्र निवारा यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे, अशा अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्था,सामाजिक संस्था, संघटना मदतीसाठी पुढे आले असून उरणमधील मी उरणकर ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट आणि वुमेन ऑफ विसडम शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीचे प्रयत्न सुरु असून या नागरिकांना फरसाण, बिस्कीट, कपडे, चादर, बेडशीट, पाणी, मेडिकल कीट, दूध, पावडर, मेणबत्त्या, माचीस आदि जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

उरणमध्ये गांजा ओढणार्‍यांना अटक

उरण ः उरण शहरात अक्षर बिल्डिंगच्या मागील बाजूस से-47 द्रोणागिरी येथे पोलिसांनी तीन आरोपींना गांजा ओढताना शिताफीने अटक केली आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कावळे, पोउनि गायकवाड, पोउनि कोळेकर, पोलीस नाईक कराळे, पोलीस नाईक सोनावणे, पोलीस नाईक कुथे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कलम 370 रद्दचे महायज्ञाद्वारे स्वागत

पनवेल : काश्मीरमधील कलम 370 व 35 अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. काश्मीरमधील मूळ रहिवासी असलेल्या काश्मीरी पंडित समाजाने महायज्ञ करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. गुरुवारी (दि. 8) खारघरमधील शारदा सदन याठिकाणी या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरी पंडित असोसिएशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply