Breaking News

खारघरमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला रिक्षाचालक जेरबंद

पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत खारघरमध्ये कारवायी करून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका रिक्षा चालकाला अटक केली आहे.
खारघर सेक्टर- 34 बी मधील बोंजर सोसायटीच्या समोरील रोडवर एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर, सेक्टर- 34 मध्ये छापा टाकून निशार मोहम्मद शेख (वय 23) या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले.
या वेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 5 लाख 35 हजार 600 रुपये किंमतीचे 53.56 ग्रॅम मेथ्यॅक्युलोन सापडले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने निशार शेख याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या जवळ सापडलेले मेथ्यॅक्युलोन जप्त केले.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply