पनवेल : वार्ताहर
भरधाव टेम्पोने समोरून येणार्या एका मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोर घडली आहे.
टाटा 407 टेम्पो क्रमांक (एमएच 04 जीएफ 4636)वरील चालक त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोरून जात असताना समोरून आलेल्या मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात अक्षय कनवाळू (वय 27) हा गंभीर रित्या जखमी होऊन मयत झाला आहे. तर एक अनोळखी व्यक्ती जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Check Also
लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …