पनवेल : रामप्रहर वृत्त
सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. या पावसात गटारांमध्ये पाणी तुंबून तसेच रस्त्यामुळे नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तळोजा, पापडीचा पाडा या परिसराची अधिकार्यांसह पाहणी केली तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, प्रभाग क्रमांक 3चेअध्यक्ष मुनाफ पटेल, केंद्र प्रमुख छबी पटेल, निर्दोश केणी, इस्माईल पटेल, जुनित खान, अजित दिवाले, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त वैभव विधाते, वॉर्ड अधिकारी जितू मढवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …