पनवेल : वार्ताहर
दोन मोटारसायकलस्वरांच्या समोरासमोर धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
वैभव धनुरे हा त्याच्या मालकीच्या मोटरसायकल (एमएच 04 जेजे 9703) वरून मित्राच्या घरी कार्यक्रमासाठी जात असताना समोरून येणार्या एका मोटरसायकलस्वाराची वैभव धनुरे याच्या मोटारसायकलीला धडक बसली. या धडकेत वैभव धनुरे हा गंभीर जखमी झाला असून त्याचा उजवा पाय व हाताचे बोट फ्रक्चर झाले आहे. या घटनेची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …