Breaking News

रायगडात पावसाचे धूमशान; जनजीवन विस्कळीत

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरून नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. जिल्ह्यात बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 163.4 मिमी पाऊस पडला. माथेरानमध्ये 342.6 मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुंडलिका, अंबा, सावित्री, पातळगंगा या चार नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत होत्या. दोन दिवसांत दोन घरांचे पूर्णतः नुकसान झाले, तर 29 पक्क्या व 25 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. याशिवाय वाहतुकीवर परिणाम झाला.
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply