Breaking News

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी पनवेलमध्ये व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने रविवारी (दि. 30) सायंकाळी 5 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार व प्रतिपक्ष या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे. तोरसेकर यांनी 1969मध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारिता केली. 1985 ते 1989 या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विवेक, चित्रलेखा यांसारख्या साप्ताहिकमध्ये त्यांनी काम केले. त्यांचे प्रतिपक्ष नावाचे यूट्यूब चॅनेल आहे, तर माऊच्या जागता पहारा या ब्लॉगवर 75 लाखांहून अधिक वाचक आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply