Breaking News

‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी ठरला जगज्जेता

जागतिक पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू, तीन वेळा ’महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत जगज्जेतेपद काबीज केले.
जागतिक पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरीने उपांत्य फेरीत त्याचा सामना गतविजेता आणि संभाव्य विजेत्या जेसी साहोताशी झाला. त्याने अटीतटीच्या सामन्यात साहोताचा 11-08 अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर 10 गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01ने जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बागली या गावचा विजय चौधरी हा महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून तो भारताचा नवीन ’रेसलिंग सेनसेशनल’ बनला आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply